कामोठे येथील भूमी टॉवर मध्ये स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा..
कामोठे येथील भूमी टॉवर मध्ये स्वतंत्रता दिवस उत्साहात साजरा..

कामोठे :१५ ऑगस्ट  ( प्रतिनिधी)आपल्या  देशाचा अमृत महोत्सवी वर्धापन दिना निमित्ताने  कामोठे से.36 मधील भूमी टॉवर मधे स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा झाला, या निमित्ताने पूर्ण इमारतीमध्ये तिरंगी झेंडे लावण्यात आले व रोषणाई  करण्यात आली या वेळेस बिल्डिंग मधे संस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आले होते व छोट्या बालगोपाळांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . सकाळी माजी नगरसेवक  माननीय डॉ.अरुण कुमार भगत  यांच्या हस्ते भूमी टॉवर इमारती समोर ध्वजारोहण करण्यात आले. या वेळेस भूमी टॉवर मधील अनेक रहिवासी उपस्थित होते. माजी नगरसेवक विकास घरत यांच्या हस्ते बिल्डिंग परिसरात वृक्षारोपण करण्यात आले या वेळेस कामोठे मधील प्रसिद्ध वकील जय पावणेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आणि मुख्य आकर्षण  पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त  विठ्ठल ढाके उपस्थित होते.यांच्याही  हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे विशेष आमंत्रित 4k चॅनल चे संपादक गौरव जहागीरदार होते त्यांच्या हस्ते चित्रकला स्पर्धेतील मुलांना बक्षीस वितरण केले .यावेळी  भूमी टॉवर चे सरचिटणीस विलास कलंगे,  चेअरमन कारभारी गायकवाड, सुब्रमण्यम श्री.अय्यर, श्री.राज, सौ सुषमा कलंगे, भावना सरदेसाई व अपर्णा सुब्रमण्यम या महिलांचा विशेष सहभाग होता यावेळी भूमी टॉवर मधील अनेक नागरिक उपस्थित होते. या वेळेस माणदेशी फॉउंडेशन तर्फे घरगुती महिला तर्फे पारंपरिक पध्दतीने बनविलेले कपडे, अलंकार, आणि खाद्य पदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते.पूर्ण बिल्डिंग मध्ये उत्साहाचे वातावरण होते. बिल्डिंग मधील अनेक सदस्य एकमेकांना भेटले व एकमेकांबद्दल चर्चा होऊन भविष्यात ही असे कार्यक्रम साजरे करण्याचे ठरवण्यात आले.
Comments