पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध अंतर्गत कामकाज कौतुकास्पद - पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह..
नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी केले वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर व त्यांच्या टीम चे कौतुक  


पनवेल दि. १३ ,(संजय कदम  )  : पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध  व इतर सर्व कामकाज कौतुकास्पद असून कायदा व सू व्यवस्था माध्यमातून गुन्हेगारी नियंत्रणात असल्याचे प्रतिपादन नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी वार्षिक तपासणी अनुषंगाने पनवेल तालुका पोलीस ठाण्यास  भेट दिली असता केले . 
                           यावेळी त्यांचे स्वागत परिमंडळ -०२ चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील ,सहा. पोलीस आयुक्त भागवत सोनावणे,वपोनि रवींद्र दौंडकर  व इतर अधिकारी वर्गांनी त्यांचे स्वागत केले . तसेच त्यानी संपूर्ण पोलीस ठाण्याची पाहणी केली तदनंतर पनवेल तालुका पोलीस ठाणेतील  सर्व अधिकारी व अंमलदार  यांचा   एकत्रित दरबार आयोजित  करून   त्यांच्या अडीअडचणी   ऐकून घेतल्या  व  त्या सोडविण्याचे उपस्थिताना आश्वासन दिले . पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील बंधू व भगिनींची मंथन हॉल येथे बैठक आयोजित करून त्यांना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्यांची नेमकी काय भूमिका असायला पाहिजे ?यावर योग्य ते मार्गदर्शन केले. तसेच पोलीस ठाणेकडील किंमती व साधारण मुद्देमालाचे निरक्षण करून संपूर्ण अभिलेख तपासून पोलीस ठाणेचे एकंदरीत कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले व यापुढेही अशीच कामगिरी ठेवणेच्या सूचना दिल्या.पनवेल तालुक्याचा परिसर व तेथील स्वछता, नीटनेटकेपणा ,कामकाजाची पद्दत , गुन्ह्याची केलेली उकल या सर्व गोष्टीबाबत वपोनि रवींद्र दौंडकर यांचे नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी  खास करून कौतुक केले . 
फोटो - नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह पोलीस ठाणे परिसराची पाहणी करतांना
Comments