सोन्याचे दागिने केले लंपास ...
सोन्याचे दागिने केले लंपास 

पनवेल / दि. ०१(संजय कदम): उघड्या घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले ५५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. 
         
सौ . कामिनी जुगारे  (वय २३) रा. भातान यांच्या  उघड्या घरात अज्ञात इसमाने प्रवेश करून कपाटात ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र व कानातील सोन्याची साखळी तसेच इतर कागदपत्रे असा मिळून जवळपास ५५ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments