शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बबनदादा पाटील यांच्या कडून वैद्यकीय मदत..
बबनदादा पाटील यांच्याकडून वैद्यकीय मदत..

पनवेल / वार्ताहर  : -  सौ. लक्ष्मी अशोक मुंगेकर यांनी डोळ्याच्या इलाजाकरीता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली होती. सदरची बाब उद्धव ठाकरे यांनी त्वरित रायगड जिल्हा संपर्क प्रमुख  बबनदादा पाटील यांना संपर्क करून सदर व्यक्तीस मदत करणेस सांगितले. बबनदादा पाटील यांनी त्वरित सदर महिला सौ. लक्ष्मी अशोक मुंगेकर यांना पनवेल शहर शाखेत बोलवून त्यांना त्यांच्या डोळ्याच्या उपचारासाठी रोख ५०,००० रुपयांची मदत केली. 
 
यावेळी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील, माजी पनवेल शहर उपनगराध्यक्ष अनिल टेमघरे, पनवेल शहर प्रमुख प्रविण जाधव, कपिलशेठ मखवाणा, उपशहर प्रमुख सनी टेमघरे, विभागप्रमुख अमित माळी, कुणाल कुरघोडे, चंद्रकांत दसवते आणि अशोक मुंगेकर व लक्ष्मी मुंगेकर यांची उपस्थित होते.
Comments