के.गो.लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न..
के.गो.लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न 
पनवेल वैभव वृत्तसेवा : -  
के.गो.लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.- २४/०७/२०२२ रोजी श्रीमती सुनीता एस.जोशी  यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली. 
सभेच्या सुरुवातीस ज्ञात-अज्ञात मृत्यू झालेल्या सभासदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
रायगड जिल्हा ग्रंथालय संघ अलिबाग संघाचे अध्यक्ष संजय बोंदार्डे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यांत आले. 
संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुनीता एस.जोशी ह्यांनी प्रास्ताविक केले. वाचनालया संदर्भात माहिती देताना त्यांनी सांगितले वाचनालयाची वेळ सकाळी ८.३० ते रात्री ८.०० अशी करण्यात आली असून नाममात्र शुल्कदरात अभ्यासिका सुरु करण्यात आली आहे. करोना काळात रोख देणगी स्वरुपात व पुस्तकाच्या स्वरुपात देणगी देणाऱ्याचे आभार मानले. 
सह.कार्यवाह जयश्री राजेंद्र शेट्ये यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखविले. सन २०२१-२०२२ या करीताचा वार्षिक अहवालाचे वाचन कार्याध्यक्ष विनायक नरहर वत्सराज यांनी केले. कार्यवाह काशिनाथ लक्ष्मण जाधव यांनी उत्पन्न खर्च व ताळेबंद पत्रक यांचे वाचन केले. सन २०२२-२०२३ मधील अंदाज पत्रकाचे वाचन ऍड.माधुरी राजन थळकर यांनी केले.संस्थेकरिता तयार करणेत आलेल्या नवीन योजनेच्या प्रगतीची माहिती अध्यक्षा श्रीमती सुनीता एस.जोशी यांनी दिली. सन २०२२-२०२३  करीता लेखापरीक्षकाची नेमणूकीचा ठराव उपाध्यक्ष श्याम शांताराम वालावलकर यांनी मांडला. 
कार्यकारीणीचा कार्यकाल संपल्याने “निवडणूक अधिकारी” मोहन मुझूमदार यांच्या देखरेखीखाली निवडणूक प्रक्रिया याच वेळी पूर्ण करण्यांत आली . श्रीमती सुनीता एस.जोशी यांचे एकमेव पॅनल या ठिकाणी बिनविरोध निवडण्यात्त आले असून अध्यक्षपदाची धुरा श्रीमती सुनीता एस.जोशी यांच्यावर देण्यांत आली असून उपाध्यक्ष / श्याम शांताराम वालावलकर, कार्याध्यक्ष- विनायक नरहर वत्सराज, कार्यवाह - काशिनाथ लक्ष्मण जाधव, सह.कार्यवाह - जयश्री राजेंद्र शेट्ये ,कार्यकारीणी सदस्य ऍड माधुरी राजन थळकर, सौ.हिमालिनी गिरीष कुलकर्णी , श्रीमती हेमा दिलीप गद्रे ,प्रशांत गजानन राजे ,
सुनिल नथुराम खेडेकर, रमेश धोंडू चव्हाण यांची नियुक्ती करण्यांत आलेली आहे. 
उपस्थित सभासदांचे आभार मानून वाचनालयाच्या बिल्डिंगसाठीची भविष्यकाळासाठीची तरतूद अगोदरच करुन ठेवण्यांत आली असून सभेस उपस्थित सभासदांची त्यासाठी मदत लागेल. माजी नगरसेविका सौ.निर्मला म्हात्रे यांनी बिल्डिंग फ़ंडासाठी  २५००/- देणगी जाहीर करुन त्यासाठी पनवेल मधील प्रतिष्ठिताची मदत घेऊ असे सभे पुढे सांगितले. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुनीता एस.जोशी यांनी यावेळी उपस्थित सभासदाचे आभार मानले. 
वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली.सभेचे सूत्रसंचालन हिमालिनी गिरीष कुलकर्णी यांनी केले. तर उपस्थितांचे प्रशांत गजानन राजे यांनी आभार मानले.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image