इसम बेपत्ता ...
पनवेल दि २८ ( संजय कदम) : अभ्युदय बँक पनवेल येथे गेलेला एक इसम अद्याप घरी न परतल्याने तो हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अभिषेक शिवमुनि विश्वकर्मा (वय ३२) रा. भानघर , रंग गोरा , उंची ५ फूट ६ इंच, बांधा मजबूत, डोक्याचे केस काळे लांब, दाढी वाढलेली असून अंगात लाल रंगाचा टी शर्ट व काळ्या रंगाची फॉर्मल पॅन्ट घातलेली आहे तसेच पायात काळ्या रंगाची त्यावर हिरव्या पट्या असलेली सॅंडल आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे फोन नंबर ०२२२७४५२३३३ किंवा पोहवा संदीप नवले यांच्याशी संपर्क साधावा.
फोटो - अभिषेक विश्वकर्मा