बबनदादा पाटील यांचा असामान्य लोकसेवक पुरस्काराने सन्मान ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सिटी बेल समूहाचे कौतुक..
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सिटी बेल समूहाचे कौतुक..
पनवेल/ प्रतिनिधी.
अल्पावधीतच वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या सिटी बेल वृत्त समूहाच्या वतीने शुक्रवारी पनवेल येथे असामान्य लोकसेवक आणि आदर्श लोकसेवक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती ताई तटकरे उपस्थित होत्या. तर मावळचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
शिक्षण संस्था उभारून पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे उघडून देणाऱ्या बबन दादा पाटील यांचा यावेळी आसामान्य लोकसेवक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कार मूर्तींचा अल्पपरिचय असणारा विशेषांक प्रकाशित करण्यात आला. लगेच दुसर्‍या दिवशी अर्थात शनिवारी बबनदादा पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना मिळालेल्या असामान्य लोकसेवक पुरस्काराबाबत मुख्यमंत्र्यांस कळविले. बबन दादा यांचा परिचय असलेल्या विशेष अंकाची प्रत देखील भेट दिली. शिक्षण संस्था उभारून त्या नेटाने चालविण्याचे बबन दादा यांचे कसब अजब आहे. योग्य माणसाला योग्य पुरस्कार दिल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी सीटी बेल वृत्त समूहाचे आभार मानले आहेत.
       शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार, प्रवक्ते बबन दादा पाटील हे एक अजब रसायन आहे.
राजकारणात आक्रमक नेतृत्व करण्यासाठी प्रसिद्ध असणारे हे व्यक्तिमत्व शिक्षण संस्था उभारणीच्या कामात मात्र संयमाने आणि नेटाने पुढे जात आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका व संघटित व्हा या दिलेल्या कान मंत्राचे ते पुरेपूर पालन करत आहेत.
      स्वतः अल्पशिक्षित असून देखील शिक्षणाचे महत्त्व परिपूर्ण रित्या जाणुन शिक्षणासाठी आग्रही असणाऱ्या या अवलियाचे वर्णन करण्यासाठी शब्द थिटे पडतील. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेज, बी के पाटील डी फार्मसी आणि बी फार्मसी कॉलेज, बी के पाटील जुनियर कॉलेज, सी बी एस सी बोर्डाचे दी इलाईट पब्लिक स्कूल, कमळू पाटील माध्यमिक विद्यालय, मीनाताई ठाकरे प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल, ए बी पाटील माध्यमिक विद्यालय, स्टेट बोर्ड अभ्यासक्रमाचे इलाईट पब्लिक स्कूल, दी ईलाइट जुनियर कॉलेज, एस व्हि कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स अशा संस्था उभारून त्यांनी विद्या दानाचा यज्ञ चेतविला आहे.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image