शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे कामोठे वसाहती मधील बस सेवेमध्ये वाढ ..
शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे कामोठे वसाहती मधील बस सेवेमध्ये वाढ ..

पनवेल दि.१६ (संजय कदम) : शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे कामोठे वसाहतीमधील मानसरोवर स्टेशन ते कळंबोली (बस क्र-५६) बससेवेमध्ये वाढ करण्यात आली आहे. 
या संदर्भात कामोठे शिवसेना शहर प्रमुख राकेश गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभाग प्रमुख प्रभाग क्र-१३ चे  सचिन मनोहर त्रिमुखे यांनी नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमचे बेलापूर विभागाचे आगार व्यवस्थापक योगेश कडुसकर यांच्याकडे सात्यत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार ६ बससेवेची वाढ करण्यात आली आहे. व त्याची प्रत्यक्षात सुरुवात झाल्याने कामोठे मधील नागरिकांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत. 

फोटो : शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे सुरु झाली बससेवा
Comments