इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (इग्नु) प्रवेश प्रक्रिया जुलै २०२२ साठी खुली..
पनवेल / वार्ताहर - : इग्नुच्या मास्टर, बॅचलर, पी जी डिप्लोमा, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट प्रोग्रामसाठी जुलै २०२२ मध्ये नवीन प्रवेश सुरू झाले आहेत. आणि प्रवेशाची अंतिम तारीख ३१ जुलै २०२२ आहे. इग्नु उच्च शिक्षणात २४० हून अधिक प्रोग्राम ऑफर करत आहे.
डॉ. ई. कृष्णा राव, इग्नू क्षेत्रीय केंद्र मुंबईचे क्षेत्रीय निदेशक यांनी माहिती दिली की, मुंबई विभागात सर्व प्रोग्राम करीता प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली आहे. मागील सेमिस्टर/वर्षात आधीच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील सेमिस्टर/वर्षासाठी री-रजिस्ट्रेशन प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. री-रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख ३० जून २०२२ आहे. तपशीलवार माहितीसाठी, विद्यार्थी www.ignou.ac.in संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.
त्यांनी पुढे इग्नू-एम एस डी ई च्या विस्तार केंद्रांची ओळख करून दिली. जी सरकारी आयटीआय आणि जनशिक्षण संस्था आणि प्रधानमंत्री कौशल विकास केंद्रामध्ये सुरु होतील. इग्नू या विस्तार केंद्रांद्वारे आयटीआय विद्यार्थ्यांसाठी कुशल आधारित आणि व्यावसायिक प्रोग्राम उपलब्ध करून देत आहे. इग्नू SC/ST विद्यार्थ्यांसाठी फी सवलत सुविधा प्रदान करत आहे. या सुविधेअंतर्गत एकूण ५५ प्रोग्राम येत आहेत. SC/ST विद्यार्थ्यांना एकूण ५५ प्रकारचे बॅचलर, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट शिक्षणाची संधी मोफत उपलब्ध देण्यात येते. AICTE ने इग्नुला मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (MBA) प्रोग्राममध्ये १ लाख जागांसाठी मान्यता दिली आहे, ज्यात स्पेशलायझेशन ऑनलाईन डिस्टन्स लर्निंग मोडमध्ये ९० हजार आणि ऑनलाइन मोडमध्ये १० हजार आणि मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स मध्ये ३० हजार जागा समाविष्ट आहेत. २०२२-२३ वर्षासाठी MCA प्रोग्राम (ऑनलाईन डिस्टन्स लर्निंग मोडमध्ये २० हजार आणि ऑनलाइन मोडमध्ये १० हजार) समाविष्ट आहेत. इग्नू नोकरीच्या बाजारपेठेत आणि उद्योगात अधिक मागणी असलेले अनेक प्रोग्राम ऑफर करत आहे.