शिवसेना पनवेल आयोजित मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..
शिवसेना पनवेल महानगर आयोजित मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद..
पनवेल वैभव वृत्तसेवा  :-   रविवार दि. ८ मे २०२२ रोजी शिवसेना पुरस्कृत व श्रीपुष्प प्रतिष्ठान फाउंडेशन अंतर्गत महात्मा गांधी मिशन (एम.जी.एम) मेडिकल कॉलेज हॉस्पिटल कामोठे नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक सर्जरी आणि मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन शिवसेना मध्यवर्ती कार्यालय खारघर येथे करण्यात आले. 

शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड  शिरीष घरत यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जिल्हाप्रमुख यांनी शिबीरास योग्य मार्गदर्शन केले. शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये प्लॅस्टिक सर्जरी, कॅन्सर, हृदयरोग शस्त्रक्रिया, मूत्रपिंड व मूत्रमार्ग विकार, मेंदूचे विकार, अस्थिव्यंग सर्जरी, त्वचारोग, जठर व आतडे शस्त्रक्रिया, नेत्र शस्त्रक्रिया मोतीबिंदू वगळून, कान, नाक, घसा तपासणी व शस्त्रक्रिया अशा प्रकारच्या वरील व्याधींचे निदान झाले असल्यास  एम.जी.एम. हॉस्पिटल कामोठे येथे ज्यांचे उत्पन्न १ लाखांपेक्षा असेल अशा कुटुंबाचा दारिद्र्य रेषेखालील पिवळ्या शिधा पत्रिका धारक, आणि अंत्योदय व केशरी शिधापत्रिका धारक यांचा समावेश असेल त्यांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजन / प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार करण्यात येणार आहेत. 

सदर शिबिरास श्रीपुष्प प्रतिष्ठान फाउंडेशनच्या अध्यक्षा भावना शिरीष घरत, प्रियंका शिरीष घरत, डॉ. योगिता शिरीष घरत, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील, तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, विधानसभा समनव्ययक प्रदीप ठाकूर, महानगर समन्वयक दिपक घरत, शहरप्रमुख गुरुनाथ पाटील, प्रदीप केणी, डी. एन. मिश्रा, सदानंद शिर्के, राकेश गोवारी, प्रवीण जाधव, शहर समन्वयक गिरीश धुमाल, उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी, सूर्यकांत म्हसकर, हरेश पाटील, युवासेना उपजिल्हाधिकारी अवचित राऊत, महिला आघाडी उतालुका संघटिका टिया धुमाळ, तालुका संघटिका अनिता डांगरकर, पनवेल शहर संघटिका अर्चना कुळकर्णी, नम्रता शिंदे आयोजक अनुराग लेकुरवाळे, एम.जी.एम. कामोठेचे एकनाथ बागूल, अमोल इंगेवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image