अथर्व ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून पर्यटकांना देश-विदेश पर्यटनाचा आनंद मिळणार - आ.प्रशांत ठाकूर
अथर्व ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून पर्यटकांना देश-विदेश पर्यटनाचा आनंद मिळणार - आ.प्रशांत ठाकूर     
पनवेल दि.०३ (संजय कदम) : खांदाकॉलनी येथील तीर्थराज सोयायटी मध्ये मिलिंद चंद्रकांत राणे यांनी 'अथर्व ट्रॉव्हल्स' हा नवीन व्यवसाय सुरु केला आहे. त्यांच्या या नवीन व्यवसायाच्या कार्यालयाचे भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, अथर्व ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून पनवेलसह रायगड जिल्ह्यातील पर्यटकांना देश-विदेश पर्यटनाचा आनंद मिळणार असल्याचा शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सभागृहनेते परेश ठाकूर यांनीही भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
या वेळी पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सिताताई पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी, नगरसेवक एकनाथ गायकवाड, विजय चिपळेकर, विकास घरत, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रविंद्र जोशी, खांदा कॉलनी युवामोर्चा अध्यक्ष अभिषेक भोपी, दिलीप सांघवी, सुनील ठक्कर, ज्येष्ठ पत्रकार विजय कडू, पत्रकार संजय कदम, केवल महाडिक, विशाल सावंत, चंद्रकांत शिर्के यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 


फोटो : अथर्व ट्रॅव्हल्सच्या नवीन वास्तूचे उदघाटन करताना आ प्रशांत ठाकूर सह इतर मान्यवर
Comments