चैन खेचून मोटारसायकलवरुन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या लुटारुला नागरिकांनी पकडले..
चैन खेचून मोटारसायकलवरुन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या लुटारुला  नागरिकांनी पकडले 

पनवेल / वार्ताहर - : रस्त्याने पायी चालत जाणाऱ्या व्यक्तीच्या गळ्यातील तब्बल 1 लाख 20 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन खेचुन मोटारसायकलवरुन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका लुटारुला नागरिकांनी पकडुन पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना सोमवारी रात्री कामोठे सेक्टर-6 मध्ये घडली. 
राजु केवल दाबस (38) असे या लुटारुचे नाव असून कामोठे पोलिसांनी त्याला जबरी चोरीच्या गुह्याखाली अटक करुन पल्सरवरुन पळून गेलेल्या त्याच्या साथिदाराचा शोध सुरु केला आहे.  
या घटनेतील तक्रारदार रविंद्र तानाजी गिड्डे (38) हे कामोठे सेक्टर-6 मध्ये राहण्यास असून ते पनवेल, कामोठे, कळंबोली परिसरात आपली रुग्णवाहिका चालवतात. सोमवारी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास गिड्डे आपल्या कामावरुन परतल्यानंतर ते फोनवर बोलत सेक्टर-6 मधील तृतीया अपार्टमेंटच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांच्या पाठीमागून काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा लुटारुंपैकी पाठीमागे बसलेल्या लुटारुने गिड्डे यांच्या गळ्यातील 1 लाख 20 हजार रुपये किंमतीची 30 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन खेचली. त्यानंतर दोघे लुटारु पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच गिड्डे यांनी प्रसंगावधान दाखवत त्यांची चैन खेचणाऱया लुटारुचे टी-शर्टची कॉलर पकडले. 
 त्यामुळे सदर लुटारु मोटारसायकलवरुन खाली पडल्यानंतर गिड्डे यांनी त्याला पकडून ठेवले, मात्र सदर लुटारु गिड्डे यांच्या तावडीतून सुटका करुन घेत पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याने गिड्डे यांनी आरडा-ओरड केली. त्यामुळे त्या भागातील नागरिकांनी सदर ठिकाणी धाव घेऊन लुटारु राजु केवल दाबस (38) याला पकडुन त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्या खिशामध्ये गिड्डे यांच्या गळ्यातून खेचलेली सोन्याची चैन सापडली. त्यानंतर नागरिकांनी या लुटारुला कामोठे पोलिसांच्या स्वाधीन केले. कामोठे पोलिसांनी आरोपी राजु दाबस याला जबरी चोरीच्या गुह्याखाली अटक करुन पल्सर मोटारसायकलवरुन पळून गेलेल्या त्याच्या साथिदाराचा शोध सुरु केला आहे. या घटनेत सदर लुटारु मोटारसायकलवरुन खाली पडल्याने तो जखमी झाला आहे.
Comments
Popular posts
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
शिवसेनेच्या आवाहनानंतर पोलीस व एमएसईबी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवश्यक बाबींच्या पूर्ततेमुळे विसर्जन सुरळीत ...
Image
रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत दप्तरवीना शाळा उपक्रम संपन्न...
Image
मनिषा घाडगे -खांडे यांची आध्यात्मिक छाप ; प्रवचन कीर्तन प्रशिक्षण 'अ' श्रेणी प्राप्त करून पूर्ण..
Image