अज्ञात चौकडीने ट्रेलरसह टेंम्पो चालकांना लाखो रुपयांना लुटले ..
अज्ञात चौकडीने  ट्रेलरसह टेंम्पो चालकांना लाखो रुपयांना लुटले  

पनवेल दि. ०६. ( संजय कदम ) :  अज्ञात चौकडीने ट्रेलरसह टेंम्पो चालकांना लाखो रुपयांना लुटल्याची घटना पनवेल परिसरात घडल्याने वाहन चालकांमध्ये भीतीयुक्त वातावरण आहे.   

दऱ्याप्पा घुंबरे (वय २७ ) हा त्याच्या ताब्यातील ट्रेलर पुणे - मुंबई एक्स्प्रेस वे रोड च्या पनवेल एक्झीट जवळ मुंबई लेन वरील ९. ६०० कि. मी . रोड च्या कडेला थांबून तो लघुशंके साठी गेला असता चार अज्ञात इसमानी तेथे येऊन त्याला मारहाण करून मारण्याची धमकी देऊन त्याच्या कडील रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूण ५३. ३०० रुपये किमतीचा ऐवज लुटल्याची घटना घडली आहे .तर दुसऱ्या घटनेत नागराज मराठ ( वय ३३ ) हा त्याच्या ताब्यातील टेम्पो घेऊन मुंबई -पुणे एक्स्प्रेस वे रोड ने पुणे लेन ने घेऊन जाऊन पळस्पे टॅप पोलीस चौकी जवळील अंदाजे ९. ८०० कि. मी. जवळ आल्यावर रस्त्याच्या बाजूला आपला टेंम्पो उभा करून तो लघुशंके साठी गेला असता अज्ञात चार इसमाने तेथे येऊन त्याला धमकावून त्याच्या पॅन्ट च्या खिशातील ६६. ४०० रुपये काढून घेऊन ते पळून गेल्याने  याबाबत ची तक्रारी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत .
Comments