स्किल ऑनलाईन गेम जुगावर तालुका पोलिसांची कारवाई..
तालुका पोलिसांची कारवाई

पनवेल, दि.17 (वार्ताहर) ः स्किल ऑनलाईन गेम हा जुगावर खेळणार्‍या आठ जणांविरुद्ध पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून रोख रक्कम, स्कॅनर, स्क्रिन संगणक, सीपीयु, किबोर्ड असा मिळून जवळपास 31 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
जुने पनवेल-पुणे हायवे रोडवरील कोन गाव परिसरात एका गाळ्यामध्ये बेकायदेशीररित्या संगणकाद्वारे ऑनलाईन जुगार चालविला जात असल्याची माहिती वपोनि रवींद्र दौंडकर यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि गिरीधर गोरे, गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल सपोनि विवेक भोईर, सपोनि प्रवीण फडतरे, पोलीस उपनिरीक्षक आकाश पवार व पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून 31 हजार 100 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
Comments
Popular posts
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
शिवसेनेच्या आवाहनानंतर पोलीस व एमएसईबी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवश्यक बाबींच्या पूर्ततेमुळे विसर्जन सुरळीत ...
Image
रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत दप्तरवीना शाळा उपक्रम संपन्न...
Image
मनिषा घाडगे -खांडे यांची आध्यात्मिक छाप ; प्रवचन कीर्तन प्रशिक्षण 'अ' श्रेणी प्राप्त करून पूर्ण..
Image