२३ टन सिमेंटचा अपहार ...
२३ टन सिमेंटचा अपहार ..

पनवेल दि ०६ (वार्ताहर) : २३  टन खुले सिमेंट ज्याची  किंमत १ लाख ८८ हजार १७० रुपये इतकी असून त्याचा अपहार केल्याची घटना कळंबोली परिसरात घडली आहे . 
                      उरज सिमेंट कॅरिअर या ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये चालक म्हणून काम करणाऱ्या राजकुमार हरदेव याने  ट्रकमध्ये १ लाख ८८ हजार १७० रुपये किमतीचे २३ टन खुले सिमेंट भरले होते . सिमेंट गोरेगाव येथे पोहचविणे अपेक्षित होते , परंतु त्याने सिमेंटचा परस्पर अपहार करून ट्रक एसीसी कंपनीच्या समोर उभा करून पळून गेला आहे . हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्याच्याविरोधात कळंबोली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे.
Comments