पनवेलच्या सायली ठाकूरचा एम.पी.एस.सी परीक्षेत राज्यात डंका..
ओबीसी महिला प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक 

कळंबोली (दीपक घोसाळकर) : जिल्हा परिषदेच्या  प्राथमिक शाळेत शिक्षण  घेतलेल्या नेरे येथील सायली श्याम ठाकूर ने एमपी.एस.सी परीक्षेत ओबीसी महिला  प्रवर्गातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. शासन सेवेत प्रथम वर्ग अधिकारी म्हणून तिची  नियुक्ती  करण्यात येणार आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून  खडतर अभ्यासाचा डोंगर पार  करून सायली ठाकूरने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल तिच्यावर पनवेल मधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
           पनवेल मधील नेरे येथील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या सायली शाम ठाकूर ने उच्च माध्यमिक शिक्षण सुधागड एज्युकेशन सोसायटी च्या के.आ.बांठिया विद्यालय मध्ये पूर्ण केले. त्यानंतर तिने खालापूर जवळील शांतिनिकेतन तंत्र विज्ञान  महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पदवी प्राप्त केली .मात्र खाजगी कंपनी मध्ये सेवा करण्यापेक्षा  प्रशासकीय सेवा करून जनसेवा करण्याची जिद्द उराशी बाळगल्याने तिने एमपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. अभियंता चे शिक्षण पूर्ण करून सुद्धा शासकीय सेवेचा ध्यासाने तिने एमपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले आहे . महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने सन २००० मध्ये घेतलेल्या परीक्षेतून राज्यातील ओबीसींच्या महिला प्रवर्गातून तिने राज्यात प्रथम क्रमांक पटकावून पनवेल सह राज्याचे नाव उंचावले आहे .घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने व परिस्थितीची जाण मनात  घर करून राहिल्याने तिने शासकीय सेवेचा ध्यास हा शालेय जीवनामध्ये घेतला होता.अन् सायलिने ते प्रत्यक्षात आपल्या अपार मेहनत व जिद्दीच्या जोरावर खडतर अभ्यासक्रम पूर्ण करून प्रत्यक्षात पूर्ण ही करून दाखविला.शासन सेवेसाठी आवश्यक असणारी एमपीएससी परीक्षा पहिल्याच प्रयत्नात पास झाल्याने नुकतीच शासकीय सेवे पूर्वी असणारी खरतर मुलाखतही तिने यशस्वी पूर्ण केली आहे.आता तिला शासन सेवेतील प्रथम वर्ग अधिकारी म्हणून नियुक्ती दिली जाणार आहे .सायली ठाकुर चे वडील नोकरी करत असून आई ही गृहिणी आहे .मात्र आई वडिलांनी घेतलेल्या अपार कष्टाचे चीज तिने करून दाखवले आहे . सायलीने मिळवलेल्या अपूर्व यशाबद्दल विशेष करून आगरी समाजातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे . आम्ही घेतलेल्या अपार कष्टाचे सायलीने स्वकर्तृत्वावर व कोणताही क्लास न लावता खडतर असा अभ्यासक्रम पूर्ण करून एमपीएससी परीक्षेत मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल आमच्या कुटुंबियांचा व नातेवाईकांचा आनंद गगनात मावेनासा झाला असल्याचे  सायलीचे वडील श्याम ठाकूर यांनी बोलताना आनंद व्यक्त केला आहे.
 
Comments