वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, लोडशेडिंग विरोधात शिवसेनेचा धडक मोर्चा..
वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, लोडशेडिंग विरोधात शिवसेनेचा धडक मोर्चा

पनवेल / दि.३० : वारंवार खंडित होणार वीजपुरवठा, लोडशेडींग व नागरिकांना भेडसावणाऱ्या सर्व समस्यांना वाचा फोडण्यासाठी शिवसेनेने दि.३० एप्रिल रोजी खांदा कॉलनी येथील महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. 

जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या आदेशानुसार पनवेल विधानसभा संघटक दिपक निकम, महानगर प्रमुख रामदास शेवाळे  व खांदा कॉलनी शहर प्रमुख  सदानंद शिर्के यांच्या नेतृत्वाखाली खांदा कॉलनीतील महावितरणच्या कार्यालयवर वारंवार खंडित होणार वीजपुरवठा, लोडशेडींग व नागरिकांना भेडसावणाऱ्या सर्व समस्यांना वाचा फोडण्यासाठी धडक मोर्चा काढला होता. सदर मोर्चाला खांदा कॉलनी मधील पुरुष व महिला पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये पनवेल महानगर संघटीका अँड शुभांगी शेलार, उपमहानगर प्रमुख रामदास गोंधळी, उपमहानगर संघटक शिवाजी दांगट, उपमहानगर संघटिका संचिता राणे, शहर संघटिका सानिका मोरे ,शहर समन्वयक गणेश परब, उपशहरप्रमुख दत्तात्रेय शंकर महामुलकर,संपत सुवर्णा, उपशहरसंघटक संजीव गमरे, प्रकाश वानखेडे, विभाग प्रमुख सुशांत जाधव, भोजराज होकार, उपविभाग प्रमुख जयराम खैरे ,चंद्रगुप्त साळवी शाखाप्रमुख सुनील औटी, प्रसाद शिरोडकर, पुंडलिक म्हात्रे, सचिन धाडवे ,विठ्ठल चव्हाण, मंगेश पवार, माजी शाखाप्रमुख राजीव गंमरे उपशाखाप्रमुख बाळू भोर,दीपक चांदिवडे, शाखा संघटिका रशिदा शेख, शिवसैनिक किशोर कदम सह युवासैनिक व प्रसिद्ध डॉ दंत चिकित्सक विघ्ने व दुग्ध व्यावसायिक गावडे इत्यादी सह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसाहतीमधील विजेच्या समस्येसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून लवकरात लवकर वीज वितरण सुरळीत न केल्यानं महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठीकीत दिला.



Comments