गावदेवी प्रीमियर लीगला मोठ्या उत्साहात सुरुवात
पनवेल दि.१६ (वार्ताहर) : पनवेल शहरातील प्रतिष्ठेची मानली जाणारी गावदेवी प्रीमियर लीगची सुरुवात शुक्रवार दि. १५ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे वर्ष आठवे गावदेवी प्रीमियर लीगची ही स्पर्धा असून अंडरआर्म बॉक्स क्रिकेट सामने खेळवले जातात. गावदेवी मंदिरासमोरील प्रांगणात ही तीन दिवसीय स्पर्धा असून त्याचा शुभारंभ पत्रकार संजय कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी आयोजक कमिटी मेंबर शांतनु घरत, विकी काळे, जागृत भोईर, ओमकार धावत्रे, राहुल राऊत, रवी शेंडे, ऋतिक बदले, अनुराग घरत, अवधूत घरत, श्रीकांत भोपी, संजय पाटील आदि उपस्थित होते.
फोटो : गावदेवी प्रीमियर लीगची मोठ्या उत्साहात झालेली सुरुवात