नविन पनवेल शहाराला भेडसावणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नावरून शिवसेना महिला आघाडी आक्रमक..


सिडकोला व महाराष्ट्र जलप्राधिकरण मंडळाला विचारला जाब
पनवेल दि.०४ (संजय कदम) : सिडको प्रशासन व महाराष्ट्र जलप्राधिकरण मंडळाच्या दुर्लक्षित कामांमुळे नवीन पनवेल शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असून या संदर्भात शिवसेना महिला आघाडी आज आक्रमक झाली होती व त्यांनी या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला.  

आज नविन पनवेल महिला शहर संघटक अपूर्वा प्रभू यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जलप्राधिकरण मंडळ यांच्या कार्यालयात नविन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख, उपशहर संघटिका सुगंधा शिंदे, विभाग संघटिका वैशाली थळी आणि वैशाली घाग, मनीषा शिंदे, सतीश गायकर आणि शहरातील बऱ्याच महिलांनी धडक मारून पाणी प्रश्नासंदर्भात जाब विचारला. 
पनवेल महानगपालिका क्षेत्रात असलेल्या नविन पनवेल शहाराला भेडसावणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न  कित्येक वर्ष महिला आघाडी शिवसेनेच्या माध्यमातून सिडको कार्यालय आणि महाराष्ट्र जलप्राधिकरण यांच्यासमोर मांडत आहोत तरीही परिस्थिती जैसे थे. जलप्राधिकरण कार्यकारी अभियंता सूर्यवंशी यांच्याकडून पाण्याचा मुबलक साठा सिडकोला मिळत असूनही सिडको योग्य प्रकारे पाण्याचा पुरवठा प्रत्येक सेक्टरला करू शकत नाही याचे कारण म्हणजे पाणी साठवायला नवीन पनवेल मध्ये पाण्याच्या टाक्याच उपलब्ध नाही. काही वर्षापूर्वी एक टाकी पडली आणि दुसरी पडायच्या स्थितीत आल्यामुळे पाडली गेली पण त्याजागी दुसऱ्या टाक्या अध्याप बांधल्या गेल्या नसल्याने पाण्याचा साठा होऊ शकत नाही आणि सिडको आज नागरिकांना पाण्यासारख्या जीवनावश्यक हक्काला मुकावे लागत असल्याचे अपूर्वा प्रभू यांनी सांगितले. तरी या संदर्भात उपाययोजना करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. 


Comments