श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त मोफत आरोग्य शिबिराचे नवीन पनवेल येथे आयोजन


सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अ‍ॅण्ड मेडिकल ट्रस्ट अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी

पनवेल / वार्ताहर : - अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित शाखा पनवेल तर्फे हनुमान मंदिर, पोदी नं. 3, सेक्टर-16 , नवीन पनवेल येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सोहळ्याचे नियोजन 22 एप्रिल ते 28 एप्रिल या काळात करण्यात आले आहे. 
या काळात श्री गुरूचरित्र, भागवत, नवनाथ या ग्रंथाचे पारायण,  प्रहर सेवा, नित्य विशेष याग, त्रिकाळ आरती तसेच विविध आध्यात्मिक सेवा पार पडतील,  तसेच दिंडोरी प्रणित मार्गाच्या 20% अध्यात्म आणि 80% समाजकारण या नुसार 24 एप्रिल रोजी रक्तदान शिबीर तसेच मंगळवार 26 एप्रिल रोजी सद्गुरू मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अ‍ॅण्ड मेडिकल ट्रस्ट, त्र्यंबकेश्वर अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी तसेच नाडी परीक्षण आणि सर्व रोग निदान शिबीर सकाळी 10 ते रात्री 8 या काळात आयोजित केले आहे तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घेणे साठी दूरध्वनी क्र.9987573424 यथे संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. 

Comments