बेवारस मृतदेहाच्या नातेवाईकांचा पोलिसांकडून शोध..
बेवारस मृतदेहाच्या नातेवाईकांचा पोलिसांकडून शोध


पनवेल, दि.13 (वार्ताहर) ः पनवेल परिसरातील पुष्पक नगर मुख्य संतुलन जलाशय (एमबीआर) या प्लॉट न.46 सेक्टर 10 या प्लांटच्या कंपाऊंडच्या बाहेरील बाजूस असलेल्या नाल्याच्या फुटपाथवर एक बेरावास बेशध्द अवस्थेत पडलेलाची माहिती पोलिसांनी मिळाली. 
यावेळी पोलीस त्याठिकाणी गेले असता त्यांनी त्या इसमास उपचाराकरीता उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यास तपासुन उपचारापूर्वीच मयत घोषित केले आहे. यावेळी पनवेल शहर पोलीस ठाण्यात सीआरपीसी 174 नुसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अनोळखी पुरूष वय अंदाजे 60 ते 65, रंग काळ, उंची पाच फुट, चेहरा उमट, बांधा सडपातळ, डोके व दाढी वरील केस पांढरे, नाक सरळ व लांब, अंगात लाल पांढर्‍या रंगाचा हाफ टी शर्ट, व निळ्या रंगाची ट्रॅक पॅन्ट अशा वर्णनाचा इसमांबाबत माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश फरताडे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Comments