क्षुल्लक कारणावरून त्रिकुटाची टॅक्सीचालकास मारहाण..
क्षुल्लक कारणावरून त्रिकुटाची टॅक्सीचालकास मारहाण..

पनवेल दि.२६ (वार्ताहर) : क्षुल्लक कारणावरून बुलेट मोटारसायकलीवरून आलेल्या एका त्रिकुटाने खारघर से ३० मध्ये राहणाऱ्या कनवलजीतसिंग भुपेंद्रसिंग धारिवाल नावाच्या ३० वर्षीय टॅक्सीचालकास मारहाण करण्याची घटना कळंबोली येथील मिर्ची हॉटेल समोर घडली. याबाबत टॅक्सीचालक धारिवाल याने कळंबोली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅक्सीचालक कनवलजीत धारिवाला हा आपल्या मित्रासह मुंबई येथे जात असतांना कळंबोलीतील मिर्ची हॉटेल समोरील रोडवर बुलेटवरून आलेल्या सदर त्रिकुटाने धारिवाल याच्या टॅक्सीसमोर आपली बुलेट आडवी लावली. याबाबत धारिवाल याने सदर बाबतचा जाब विचारला असता, उपरोक्त तिघा जणांनी त्यास मारहाण करून पलायन केले.
Comments