दारू विकणाऱ्यावर गुन्हा दाखल...
दारू विकणाऱ्यावर गुन्हा दाखल

पनवेल दि.१४ (वार्ताहर) : पनवेल परिसरातील आदई या ठिकाणी बेकायदेशीर रित्या विनापरवाना दारू विक्री करण्याऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.    
पोलिसांनी आयुक्तालय क्षेत्रात विनापरवाना दारू विकणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. आदई गावात घरक्रमांक १५६ च्या बाजूला एक व्यक्ती दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे छापा टाकून दारूच्या २२ बाटल्या जप्त केल्या आहेत. याबाबत खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आता आहे.
Comments