सुगंधी सुपारीच्या १९ गोण्या जप्त..
सुगंधी सुपारीच्या १९ गोण्या जप्त..

पनवेल दि.२६ (वार्ताहर) : कळंबोलीमधील किराणा दुकानदार प्रतिबंधित सुगंधी सुपारीची विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने कळंबोली सेक्टर २ ई मधील दिवाकर प्रसाद याच्या दुकानात छापा टाकला असता तेथे 'सुप्रीम वाराणसी आशिक' सुपारीच्या १९ गोण्या सापडल्या. याप्रकरणी कळंबोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments