दोघांचे दागिने खेचून मोटरसायकलवरून इसम झाले पसार..
दोघांचे दागिने खेचून मोटरसायकलवरून इसम झाले पसार..

पनवेल दि.१८ (संजय कदम) : एका महिलेसह एका इसमाच्या गळ्यातील सोन्याचे दागिने खेचून मोटारसायकलीवरून पसार झाल्याची घटना पनवेल शहर व कोपरा गाव येथे घडली आहे. 
पनवेल शहरातील सिझलर हॉटेलसमोरून सौ.मनीषा मोर (वय ४४ वर्षे) या रस्त्याने पायी चालत जात असताना मोटारसायकलीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील ३७,५०० रुपये किमतीचे सोन्याचे मिनी मंगळसूत्र खेचून पसार झाले आहेत याबाबत घटनेची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 

तर दुसऱ्या घटनेत कोपरा गाव सेक्टर १० परिसरातून समीर ठाकूर हे फेरफटका मारत असताना मोटारसायकलीवरून आलेल्या दोघांपैकी एका इसमाने सोन्याची चैन खेचून ते पसार झाले आहेत. या घटनेची नोंद खारघर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments