गांजा विकणाऱ्या महिलेस अटक..
गांजा विकणाऱ्या महिलेस अटक

पनवेल दि.१४ (वार्ताहर) : बेलपाडावाडी येथे गांजा विक्री करणाऱ्या महिलेस पोलिसांनी अटक करून १४ हजारांचा ५५० ग्रॅम गांजा हस्तगत केला.
खारघरमध्ये गांजा विक्री की होत असल्याची माहिती अमली विरोधी पथकाला मिळाली होती. पथकाने धाड टाकून गांजा विक्री करणाऱ्या एका महिलेस अटक केली. बेलपाडा वाडीलगतच्या डोंगरावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. याठिकाणी बेकायदा व्यवसाय होत असल्याने सिडको आणि महापालिका प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
Comments