पनवेलमध्ये हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा..
हजारोंच्या संख्येने घेतले भाविकांनी दर्शन..

पनवेल / प्रतिनिधी  : - कोविड काळात गेली दोन वर्षे हनुमान जयंती उत्सव जल्लोषात साजरा झाला नव्हता, यावेळी कोविडचे बंधन नसल्याने मोठ्या जल्लोषात व उत्साहात हनुमान जन्मोत्सव लाईन आळी, पनवेल येथील श्री हनुमान मंदिरात साजरा झाला. हजारोंच्या संख्येने दिवसभरात भाविकांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला.

हनुमान जयंतीनिमित्त सकाळी श्री देव हनुमंताची विधिवत पूजा-अर्चा व जन्माचा पाळणा म्हणून उत्सवाची सुरवात झाली. तसेच संध्याकाळी मंगल वाद्य वाजवून सातारकर बंधूनी आपली सेवा केली, त्यानंतर महाआरती व रात्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ,पनवेल तर्फे सुश्राव्य भजन करण्यात आले.यावेळी सप्रेबुवा, बबन बुवा मढवी, अस्वले, रानडे बंधू, सुधाकर पाटील सारडेकर, गावंड बुवा, आदी भजनी बुवांच्या वतीने भजन सेवा करण्यात आली.

यावेळी हनुमान मंदिर देवस्थानचे अध्यक्ष अनिल कुरघोडे, उपाध्यक्ष रवींद्र पडवळ, सेक्रेटरी राजेंद्र घुले, खजिनदार शेखर गायखे, पुरुषोत्तम पटवेकर, चद्रकांत घुले, अनिल टेमघरे, सुनील कुरघोडे, अभिजित चव्हाण, कुणाल कुरघोडे, राजेंद्र आमले, प्रमोद कुरघोडे, बबन मढवी, गुजराती, अशोक पडवळ,आदी देवस्थानचे विश्वस्थ व सेवेकरी उपस्थित होते.
Comments