अनोख्या उपक्रमाच्या आयोजनामुळे स्मार्ट मम्मीज ग्रुप वर होत आहे अभिनंदनाचा वर्षाव..


कर्णबधिर मुलांच्या फॅशन शोने मिळवली उपस्थितांची वाहवा.पनवेल :-          पनवेल स्मार्ट मम्मिज या सेवाभावी संस्थेच्या वतीने लहान मुलांसाठी रॅम्प वॉक अर्थात फॅशन शो चे आयोजन केले होते. पनवेलच्या आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रविवार दिनांक 17 एप्रिल रोजी हा शानदार फॅशन शो संपन्न झाला.विशेष म्हणजे कर्ण बधीर मुलांनी देखील या फॅशन शो मध्ये रॅम्प वॉक करत उपस्थितांची वाहावा मिळवली.आमदार प्रशांत ठाकूर यांनी विजेत्यांना क्राऊन बहाल केले.तर माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे आणि रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा इंटक चे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत यांची या फॅशन शोला विशेष उपस्थिती होती.
         प म पा चे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे,भाजयुमो चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील, वर्षा प्रशांत ठाकूर,ममता प्रितम म्हात्रे यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुलांसाठी आठ वर्षाखालील व आठ वर्षावरील ते 13 वर्षांपर्यंत असे दोन गट बनविण्यात आले होते. ग्रुप ए मध्ये पनय वीरा हा प्रिन्स ठरला तर आरोही मजिठीया प्रिन्सेस ठरली. तर ग्रुप बी मध्ये रेनित ठक्कर याला प्रिन्स चे टायटल मिळाले तर वेदिका पवार हिने प्रिन्सेस चे टायटल जिंकले. पनवेल चे विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करणारे आणि भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी विजेत्यांना क्राऊन बहाल केले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शीतल ठक्कर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या पनवेल स्मार्ट मम्मीज या ग्रुपच्या कार्याची प्रशंसा केली. लहान मुलांसाठी आयोजित अशा प्रकारच्या फॅशन शोज मुळे त्यांच्यात आत्मविश्वास बळावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर या रॅम्प वरती कर्णबधिर मुलांना देखील फॅशन शोचा आनंद लुटता आला याबद्दल त्यांनी शीतल ठक्कर व त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष कौतुक केले.
         ग्रुप ए मध्ये मुलांच्यात स्वयम् थोरात दुसऱ्या स्थानी आला तर वेद गांधी याने तिसरा क्रमांक पटकावला. मुलींच्यात अवंतिका धात्रक ही फर्स्ट रनर अप ठरली तर सानवी कदम ही सेकंड रनर अप ठरली. मोठ्यांच्या बी ग्रुप मध्ये मुलांच्यात अथर्व भोईर फर्स्ट रनर अप ठरला तर आराध्य म्हात्रे सेकंड रनर अप ठरला. मुलींच्यात काव्या सोनेटा फर्स्ट रनर अप तर शनाया गांधी सेकंड रनर अप ठरली. याव्यतिरिक्त जियाना मुलजी हिने बेस्ट स्माईल,कियारा जैन हिने बेस्ट अटायर, अमैरा शहा हिने मिस ब्युटिफुल, सानवी कदम हिने बेस्ट वॉक, आरोही पाठारी हिने मोस्ट स्पार्कलिंग आईज ही टायटल पटकावली. मुलांच्यात समर्थ  चौहान यास बेस्ट वॉक, पनय विरा बेस्ट अटायर,स्वयम् थोरात बेस्ट फोटोजेनिक फेस, वेद गांधी मोस्ट कॉन्फिडंट,धियांश ठक्कर यास रायझिंग स्टार अशी टायटल मिळाली.
     मोठ्या ग्रुप मध्ये सान्वी तडके हिला मोस्ट फोटोजेनिक फेस, जानकी वारिया हिला रायझिंग स्टार, पूर्वा लामतुरे हिला मिस स्टायलिश, रीतन्या म्हात्रे हीला ब्यूटीफुल हेयर, तर स्वरा शिंदे हिला मोस्ट कॉन्फिडन्ट ही टायटल्स देण्यात आली. तर मुलांच्या ग्रुपमध्ये रेनीत ठक्कर याला स्टाईल आयकॉन आणि आराध्य म्हात्रे याला हॅंडसम हंक हे टायटल देऊन गौरविण्यात आले.
      या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे रोटरी क्लब संचालित कर्णबधिर मुलांच्या शाळेतील मुलांनी अत्यंत आत्मविश्वासाने रॅम्पवॉक सादर केला. उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात या मुलींचे रॅम्पवर स्वागत केले. स्मार्ट मम्मी च्या वतीने या मुलींना भेटवस्तू देण्यात आल्या. या फॅशन शो साठी डॉक्टर स्वाती हांडे, सोनी ठक्कर, आणि नंदिनी भाटकर यांनी जजेस म्हणून अत्यंत चोख पद्धतीने काम पाहिले.तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शितल ठक्कर यांच्या बरोबरीने नैना बाठीया,निता कोटक,कविता ठाकूर, मेघना भानुषाली, नेहा गांधी यांनी अथक परिश्रम घेतले. तर आपल्या बहारदार आवाजात आणि शेरो शायरीच्या अनोख्या बरसातींनी कोमल वीरा यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमात अनोखा बहर आणला.
        नगरसेविका प्रिती जॉर्ज म्हात्रे, माजी नगरसेवक प्रथमेश सोमण, शिवसेना महिला आघाडीच्या पनवेल शहर संघटिका अर्चना अनिलकुमार कुलकर्णी, सुजाता ठक्कर, डॉक्टर निलेश बाठीया,डॉक्टर सुधीर कोटक,मिसेस इंडिया पॅसिफिक विजेत्या डॉ नेहा पटेल मुळ्ये आदी मान्यवरांच्यासह शेकडो नागरिकांनी या फॅशन शोचा आनंद लुटला.तर वैभव जोशी यांच्या माध्यमातून हजारो प्रेक्षकांनी घरबसल्या या फॅशन शो चा यु ट्युब लाईव्ह वर आनंद लुटला.
Comments