भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाचा वार्षिक पदवी वितरण समारंभ..
भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाचा वार्षिक पदवी वितरण समारंभ 
पनवेल (प्रतिनिधी) 
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील भागुबाई चांगू ठाकूर (बीसीटी) विधी महाविद्यालयाचा वार्षिक पदवी वितरण समारंभ शनिवारी (दि. 09) आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ विधीज्ञ तथा अ‍ॅडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष संजीव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ झाला. या वेळी उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी देऊन गौरविण्यात आले.
या समारंभाला पनवेल विधीज्ञ संघाचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, जनार्दन भगत शिक्षण प्रसरक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, उपमहापौर सीताताई पाटील, कार्यकारी मंडळ सदस्य तथा महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, सदस्य तथा नगरसेवक अनिल भगत, सचिव डॉ. एस. टी. गडदे, कार्यकारी मंडळ सदस्य वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शितला गावंड, सीकेटी महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांच्यासह पदाधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर ज्येष्ठ विधीज्ञ तथा अ‍ॅडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष संजीव कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, तुम्ही जे वकिलीचे ज्ञान घेतले आहे ते तुम्ही आयुष्यात कोणत्याही क्षेत्रात गेला तरी कधीच वाया जाणार नाही तसेच वकिलाला कधी बोलले पाहिजे, कधी उभे राहिले पाहिजे आणि कधी शांत बसले पाहिजे याचे ज्ञान असणे आवश्यक आहे, असा मोलाचा सल्ला देऊन त्यांनी पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले की, फक्त पैसा कमवणे हे आपले ध्येय्य नसले पाहिजे. पैशाने माणूस मोठा होत नाही, तर बुद्धीने आणि समाजातील आपल्या वागणुकीने मोठा होतो. रायगड जिल्ह्यात एक नामवंत महाविद्यालय म्हणून भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयाचे नाव मोठे होत आहे. त्यामुळे येथे तुम्ही शिकला याचा तुम्हाला नक्की गर्व वाटेल. 
अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना भावी कालावधीत कशा रितीने पुढे जावे या संदर्भात मार्गदर्शन केले.
Comments