पार्श्व वुमनस् सामाजिक संस्थेतर्फे आयोजीत क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद..
पार्श्व वुमनस् सामाजिक संस्थेतर्फे आयोजीत क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल / दि,27(संजय कदम): पनवेल मधील महिलांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या "पार्श्व वुमनस् सामाजिक संस्थेद्वारे आयोजीत प्रथमगरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद शाळेतील विद्यार्थ्यांनी दिला.
पार्श्व वुमनस् सामाजिक संस्थेने गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी एक उपक्रम राबिवला.त्यांनी शाळेतील मुलांसाठी क्रिकेट ही स्पर्धा आयोजीत केली. या मध्ये 4 शाळेतील एकूण 32 मुलांनी भाग घेतला. मुलासाठी त्यांनी विशेष म्हणजे मोफत चांगल्या कंपन्यांचे शूज आणि टी शर्ट दिले. महत्वाचे एवढेच की त्या मुलासाठी त्यांनी एकदमआयपीएल सारखे क्रिकेट स्पर्धा आयोजीत केल्या सारखे होते मुलांसाठी टर्फ घेतला आणि जेवणा पासून एनर्जी र्डिं्नसही मोफत आयोजीत केले. ह्या स्पर्धेसाठी बसंती जैन, प्रतिभा जैन, निशा जैन, नेहा गांधी, भूमिका परमार, रीना परमार, कल्पना जैन, प्रिती मुनोथ, पायल कोठारी, आकांक्षा बांठिया, धनश्री गुंडेचा, नीलमसोमाणी, मनाली परमार, विमला जैन, शीतल ठक्कर, पूजा जैन, उपस्थित होत्या. त्यांनी मुलांचा उत्साह वाढविला. 
सदर क्रिकेट स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष करुन संजय जैन व यश जैन यांनी मेहनत घेतली त्याच प्रमाणे या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजक महावीर कोठारी, कल्पना कोठारी, नीरज कोठारी तसेच पत्रकार गणेश कोळी, संजय कदम, निलेश सोनावणे, नंदू धोत्रे, लक्ष्मण ठाकूर, चेतन पोपेटा, आदी उपस्थित होते. सदर क्रिकेटचे टर्फ कॅप क्लब पनवेल तर्फे मनोज ढेडीया व मनू सचदेव यांनी मोफत उपलब्ध करुन दिले. पनवेल परिसरातील रायगड जिल्हा परिषद शाळा वडघर मराठी, रायगड जिल्हा परिषद शाळा चिंचपाडा, रायगड जिल्हा परिषद शाळा मोठे ओवळे, व रायगड जिल्हा परिषद शाळा वड़घर कोपर यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

 कोट: कोणता संघ जिंकला हे महत्वाचे नसून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर खेळाचा आनंद दिसला हेच आमच्यासाठी महत्वाचे होते -पार्श्व वुमनस् सामाजिक संस्थेच्या बसंती संजय जैन.


फोटो-पार्श्व वुमनस् सामाजिक संस्थे तर्फे आयोजीत क्रिकेट स्पर्धा
Comments