भारती विद्यापीठ आय एम एस आर आयोजित माजी विद्यार्थी मेळावा- यादे २०२२..
भारती विद्यापीठ आय एम एस आर आयोजित माजी विद्यार्थी मेळावा- यादे २०२२

पनवेल दि.१७ ( वार्ताहार ) : भारती विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च माजी विद्यार्थी संघटनेतर्फे माजी विद्यार्थी मेळावा यादे-२०२२ चे आयोजन करण्यात आले होते. विविध बॅच आणि कार्यक्रमांतील ७०० हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने परिसर जल्लोषाने गुंजला होता.
माजी विद्यार्थी मेळाव्याचे २०२२ चे उद्घाटन अरुप गुप्ता (अध्यक्ष- माजी विद्यार्थी संघटना), डॉ.विलासराव कदम (प्रादेशिक संचालक-भारती विद्यापीठ नवी मुंबई संकुल), विठ्ठल मोरे (वरिष्ठ उपाध्यक्ष, नॅशनल स्टॉक एक्सचेंज), श्याम आनंद (व्यवस्थापकीय संचालक-एप्सिलॉन आय केअर), पी. रामास्वामी (माजी सहाय्यक संचालक, कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स), अमित टिपणीस (प्रमुख - एशिया पॅसिफिक, BWW ग्लोबल), आणि इतर माजी विद्यार्थी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आले
डॉ. अंजली काळसे (संचालक, बी व्ही आय एम एस आर) यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत केले आणि बी व्ही आय एम एस आर परिवाराशी जुळण्याचे आव्हान केले तसेच सर्व माजी विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक विकासाबद्दल समाधान व्यक्त केले. 
माजी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी एचआर मीट, जीडी/पीआय सत्रे, व्यक्तिमत्व विकास कार्यक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम आणि पायाभूत सुविधा विकास यासारख्या कार्यक्रमांसाठी त्यांचे अतुलनीय समर्थन करण्याचे वचन दिले आहे. निखिल वर्मा, मिथिलेश राऊल आणि भावना शर्मा ह्यांना सर्वोत्कृष्ट आउटगोइंग स्टुडंट्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.. प्रा. कुलदीप भालेराव यांना बीव्हीआयएमएसआर आणि माजी विद्यार्थी संघटनेने माजी विद्यार्थी आणि कॉर्पोरेट जगासोबतचे नातेसंबंध विकसित आणि राखण्यासाठी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.अरुप गुप्ता (अध्यक्ष), विजय चव्हाण (सचिव), शिरीष बोकडे (खजिनदार), माजी विद्यार्थी संघटनेच्या इतर सदस्यांनी तसेच पायल सिंग, माजी विद्यार्थी समन्वयक ह्यांनी सर्व मान्यवर माजी विद्यार्थी, आदरणीय प्राध्यापक सदस्य,सहकार्य करणारे शिक्षकेतर कर्मचारी आणि उत्साही विद्यार्थी स्वयंसेवक यांचे यादे २०२२ यशस्वी  करण्यासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.


फोटो - भारती विद्यापीठ आय एम एस आर आयोजित माजी विद्यार्थी मेळावा
Comments