शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदी बबनदादा पाटील..
शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदी बबनदादा पाटील
पनवेल / (अनिल कुरघोडे)  :-  मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदी बबनदादा पाटील यांची ( पनवेल, उरण, कर्जत विधानसभा) नियुक्ती करण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.

बबनदादा हे गेली सव्वीस वर्षांपेक्षा जास्त वर्षे पूर्ण रायगड जिल्ह्यात जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत होते तर सध्या ते रायगड जिल्हा सल्लागारपदी नियुक्त होते, तसेच अत्ता ते दि.बा.पाटील प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पनवेल , उरण , कर्जत विधानसभा संपर्कप्रमुखपदी नेमणूक करून मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

त्यांच्या या नियुक्तीमुळे सर्व स्तरावर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून नागरिकांना मध्ये तसेच शिवसैनिकांमध्ये आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण पसरले आहे.
Comments