त्रिकूटाची वॉचमनला मारहाण ; दुचाकी वाहनांसह संगणक व सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्याचे नुकसान..
त्रिकूटाची वॉचमनला मारहाण ; दुचाकी वाहनांसह संगणक व सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्याचे नुकसान

पनवेल दि.१८ (वार्ताहर) : करंजाडे वसाहतीमध्ये तिघा जणांनी दारू पिऊन विनाकारण दहशत निर्माण करण्यासाठी रिलायन्स स्टोअर बाहेर असलेल्या मोटारसायकलीची तसेच कर्तव्यावरील वॉचमनला शिवीगाळ करून मारहाण केली त्याचप्रमाणे रिलायन्स स्टोअरमधील २ संगणकाचे व एका सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्याचे नुकसान केल्याची घटना घडली असून याबाबत पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
करंजाडे येथे राहणारे कुणाल मोर व त्याच्या दोन साथीदारांनी रिलायन्स स्मार्ट सेक्टर ३ येथे रात्रपाळी करतेवेळी असलेल्या वैभव चौधरी यांच्या मोटरसायकलीचे लोखंडी रॉडच्या नुकसान केले त्याचप्रमाणे वॉचमनला शिवीगाळ करून मारहाण केली त्याचप्रमाणे रिलायन्स स्टोअरमधील २ संगणकाचे व एका सी.सी.टी.व्ही कॅमेऱ्याचे नुकसान केल्याबद्दल याबाबत पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments