विवाहिता बेपत्ता...
विवाहिता बेपत्ता...
पनवेल दि.१४ (वार्ताहर) : एक विवाहिता राहत्या घरातून कोणास काही न सांगता कोठेतरी निघून गेल्याने ती हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. 

पनवेल जवळील पेठ गाव येथे राहणारी रोहिणी जाधव (जरीन) वय ३३ वर्षे, रंग सावळा,ऊंची ५ फुट, केस काळे लांब, डोळे काळे, नाक सरळ असून पायात सॅंडल आहे. उजव्या हाताच्या पंजावर फुलपाखरू चित्र गोंदलेले आहे. तसेच अंगात गुलाबी रंगाचा टॉप व काळ्या रंगाची लेगीज व काळ्या रंगाची ओढणी आहे. तिला मराठी व हिन्दी भाषा अवगत आहे सोबत मोबाइल फोन आहे. या महिलेबाबत कोणाला काही माहिती असल्यास पनवेल शहर पोलिस ठाणे दूरध्वनी ०२२-२७४५२३३३ किंवा पोहवा रामचंद्र घागरे यांच्याशी संपर्क साधावा 
फोटो : रोहिणी जाधव (जरीन)
Comments