पनवेल डेंटल वेलफेअर असोसिएशन आयोजित भव्य दंतपरिषद 'डेंटकॉन २०२२' संपन्न..
भव्य दंतपरिषद 'डेंटकॉन २०२२' संपन्न..


पनवेल / वार्ताहर : -  पनवेल डेंटल वेलफेअर असोसिएशन आयोजित Dentcon 2022  ही भव्य  दंतपरिषद 9 व 10 एप्रिल रोजी विसावा रिसोर्ट येथे संपन्न झाली.
यावेळी पनवेल ,रायगड,नवी मुंबई येथील 250 पेक्षा जास्त दंतवैद्य उपस्थित होते.

डेंटल काउन्सिल ओफ महाराष्ट्र चे अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांच्या शुभहस्ते व गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मुंबईच्या  प्रमुख ,डॉक्टर डिंपल पाडावे यांच्या उपस्थितीत या परिषदेचे उद्घाटन झाले.
दोन दिवस विविध विषयांवर तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केले .तसेच कार्यशाळेचे आयोजन देखिल करण्यात आले होते.
आंतराराष्ट्रीय दर्जाचे प्रख्यात दंतवैद्य डॉक्टर संदेश मयेकर यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानाने या दोन दिवसांच्या परिषदेची सांगता झाली.
रायगड जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात दंतपरिषदेचे आयोजन करणारी पनवेल डेंटल वेलफेअर असोसिएशन ही पहिली संस्था आहे.
Comments