घरफोडी, चोरी करणारे सराईत गुन्हेगाराकडून साडेतीन लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.
घरफोडी चोरी करणारे सराईत गुन्हेगाराकडून नवी मुंबई मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेच्या पोलीसांनी सुमारे ४८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे व २३ मोबाइल फोन असा एकुण ३,५०,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत.

पनवेल दि.12 (संजय कदम) : घरफोडी चोरी करणारे सराईत गुन्हेगाराकडून नवी मुंबई मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेच्या पोलीसांनी सुमारे ४८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे व २३ मोबाइल फोन असा एकुण ३,५०,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह भोसले यांचे मार्गदर्शनाखाली घरफोडीचे दाखल गुन्हयांची उकल करणेकामी सपोनि गंगाधर देवडे व पथक नेमण्यात आलेले होते. सदर पथकाने तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून घरफोडी करणारे सराईत आरोपींची माहिती प्राप्त केली व मिळालेल्या माहितीचे आधारे सदर पथकाने रबाळे परीसरात सापळा लावून इसम नामे शफिक अब्दुल शेख यास शिताफीने ताब्यात घेतले. सदरचा इसम हा अतिशय सराईत असल्याने त्यांचेकडे कौशल्यपुर्ण चौकशी केल्यानंतर त्याने दिघा परीसरात दिवसा घरफोडी करून सोन्याचे दागिणे चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याचा रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणे,  भा.द.वि. कलम ४५४,३८० प्रमाणे दाखल गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास पुढील कार्यवाहीस्तव नमुद ताब्यात घेण्यात आलेला आरोपी नामे शफिक अब्दुल शेख, वय ४४ वर्षे, धंदा बेकार, राह. रूम नं. ३०८, काप तलाव चाळ, कॉटर गेट मस्जिद, काप तलावाचे जवळ, घुँघट नगर, भिंवडी, जि. ठाणे यास रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे ताब्यात देवून गुन्हयात अटक केली व गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचे दागिने असा एकूण २,४०,०००/- रूपये किंमतीचे ४८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे हस्तगत करण्यात आले आहेत.
सदर पथकाने तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून रबाळे परीसरात गूणाली तलाव सेक्टर १५ घनसोली येथे सापळा लावून इसम नामे मयूर दिपक रेंगे वय १८ वर्षे धंदा बेकार रा विटावा गाव, कोळीवाडा ठाणे आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यावेळी दोघेही उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले त्यांचेकडे कौशल्यपुर्ण चौकशी केल्यानंतर गुन्हयातील आरोपी नामे मयूर दिपक रेंगे वय १८ वर्षे धंदा बेकार रा विटावा गाव, कोळीवाडा ठाणे व सोबत एक विधीसंघर्षग्रस्त बालक यांनी मिळून रात्रीच्या वेळेस भाग्यलक्ष्मी मोबाइल शॉपी गावदेवीवाडी घनसोली नवी मुंबई हे मोबाइलचे दूकानाचे शटर तोडून त्यातील एकूण २३ मोबाइल चोरून नेल्याचे कबुली देउन चोरी केलेले २३ मोबाइल फोन काढून दिले सदर बाबत रबाळे पोलीस ठाणे,  भा.द.वि. कलम ४५७,३८० प्रमाणे दाखल असल्याने त्यांना पुढील कार्यवाहीस्तव रबाळे पोलीस ठाण्याचे ताब्यात देवून गुन्हयात अटक केली व गुन्हयातील चोरीस गेलेले सर्व मोबाईल हस्तगत केले.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे परीसरात घरफोडी चोरीचे प्रकारात वाढ होत असल्याने पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग,  पोलीस सह आयुक्त, डॉ. जय जाधव व अपर पोलीस आयुक्त, गुन्हे महेश घुर्ये, यांनी सदरची बाब ही अतिशय गंभीर असल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्याअनुशंगाने गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त, सुरेश मेंगडे व सहाय्यक पोलीस आयुक्त, विनायक वस्त यांनी विशेष मोहीम राबवून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश केले होते.त्यानुसार मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह भोसले, सहा. पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे, व पोलीस अमंलदार किरण राउत, मंगेश वाट, विजय खरटमोल, लक्ष्मण कोपरकर, राहुल वाघ, अजय कदम व विष्णू पवार यांनी ही कारवाई केलेली आहे.
फोटो : घरफोडीतून हस्तगत केलेले दागिने व मोबाइल.
Comments