शिवसेना पुरस्कृत स्व.सौ.पुष्पा शिरीष घरत यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य शिबीर..
शिवसेना पुरस्कृत विनामूल्य महाआरोग्य शिबीराचे आयोजन
पनवेल / प्रतिनिधी  : - 
शिवसेना पुरस्कृत श्रीपुष्प प्रतिष्ठान फाउंडेशन अंतर्गत स्व.सौ.पुष्पा शिरीष घरत यांच्या स्मरणार्थ मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन खारघर येथे रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्यावतीने करण्यात आले असून शिबिराचे उदघाटन युवासेना सचिव वरुण सरदेसाई व पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते होणार आहे.

शिबिरामध्ये रक्तदान,आरोग्य तपासणी अंतर्गत- उंची, वजन, उच्च रक्तदाब, दंत ,नेत्र तपासणी व मोफत फ्रेम वाटप, त्याचप्रमाणे मधुमेह व  व्हेमोग्लोबीन तपासणी करण्यात येणार आहे.
महाआरोग्य शिबीर हे साईधाम बिल्डिंग, पहिला मजला, साई मंदिराजवळ सेक्टर- ३ बेलपाडा खारघर येथे गुरुवार दि.२४ मार्च २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत होणार असून अधिक माहितीसाठी ९७६९६२९५१० या नंबरवर संपर्क करावा.

सदर महाआरोग्य शिबिराचा लाभ सर्व नागरिकांनी घेण्याचे आवाहन शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी केले आहे.
Comments