हिंद मराठा महासंघाच्या कोकण प्रदेशाध्यक्षपदी विनोद चव्हाण यांची नियुक्ती..


पदग्रहण सोहळा 3 एप्रिल रोजी होणार संपन्न
पनवेल, दि.25 (संजय कदम) ः हिंद मराठा महासंघ (रजि.) चे कोकण प्रदेशाध्यक्षपदी निवृत्त पोलीस अधिकारी ज्येष्ठ नेते विनोद चव्हाण यांची संघटनेमार्फत नियुक्ती करण्यात आली असून रविवार दि.3 एप्रिल 2022 रोजी पनवेल येथे आयोजित कार्यक्रमात त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
या संदर्भात कार्यक्रमाच्या नियोजनाची बैठक सकल मराठा समाजाच्या वतीने पनवेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कोकण प्रदेशाध्यक्ष विनोद चव्हाण यांच्यासह राज्य समन्वयक विनोद साबळे, राज्य समन्वयक गणेश कडू, मारुती महाडिक, संजय कदम, सचिन भगत, विकास वारदे, किरण भोसले, केदार भगत, शिवाजी देशमुख, प्रथमेश फुंडे, सुमित दसवते आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या बैठकीत चर्चा करून त्याचे नियोजन करण्यात आले.
फोटो ः निवृत्त अधिकारी विनोद चव्हाण यांच्यासह सकल मराठा समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते
Comments