हॉटेलमधील मोबाईल चोरी करणार्‍या इसमास पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड..
हॉटेलमधील मोबाईल चोरी करणार्‍या इसमास पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड

पनवेल, दि.5 (संजय कदम) ः हॉटेलमधील टेबलावर एका ग्राहकाने ठेवलेले दोन मोबाईल चोरुन नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी एका इसमास ताब्यात घेवून त्याच्याकडून चोरीचे मोबाईल हस्तगत केले आहेत.
तालुक्यातील कल्हे गाव येथील किंग्स हॉटेलमध्ये एका ग्राहकाने त्यांच्या टेबलावर ओप्पो आणि व्हिवो कंपनीचे दोन मोबाईल फोन ज्याची किंमत एकूण 23 हजार रुपये इतकी आहे हे ठेवले असताना आरोपीने चलाखीने सदर मोबाईल फोन चोरुन नेले. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करताच वपोनि रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.अविनाश पाळदे, एसआय मनोहर चव्हाण, पो.ना.राकेश मोकल, पो.कॉ.भिमराव खताळ, पो.कॉ.तुकाराम भोये आदींच्या पथकाने त्या हॉटेल परिसरात सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांना लाल रंगाचा टी-शर्ट परिधान केलेला एक व्यक्ती सदर मोबाईल चोरुन हॉटेल बाहेर पडल्याचे दिसून आले. त्यानुसार परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदाराद्वारे किरणकुमार शंकरअय्या कनाकम (35 रा.खारघर) याला ताब्यात घेतले असता त्याने सदर मोबाईल चोरल्याचे कबुल करून मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. 
फोटो ः मोबाईल चोर आरोपीसह पनवेल तालुका पोलीस
Comments