खारघर मध्ये सुरक्षा रक्षकच असुरक्षित..
खारघरमध्ये सुरक्षा रक्षकच असुरक्षित

पनवेल दि.13(वार्ताहर) :  खारघर परिसरातील एका हायस्कूलच्या सुरक्षेसाठी नेमण्यात केलेल्या चार सुरक्षा रक्षकापैकी गेट नंबर 1 येथील सुरक्षा रक्षकाच्या केबिनमध्ये बसविलेल्या सीसीटीव्हीच्या संगणकाची स्क्रीन चोरी करण्यात आल्याची घटना खारघर परिसरात घडली आहे. याबाबत खारघर पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र सुरक्षा रक्षकाच्याच केबिनमधून अश्या वस्तू चोरी झाल्यामुळे सुरक्षा रक्षकच असुरक्षित आहे कि काय असा सवाल उपस्तित होत आहे. याबाबत हंडीक तपास खारघर पोलीस करीत आहेत.

खारघर वसाहतीतील सेक्टर 15,खारघर येथील एका शाळेमध्ये शाळेच्या सुरक्षिततेसाठी शाळेच्या चार गेटमध्ये सकाळी चार सुरक्षा रक्षक व रात्रीच्या वेळी चार सुरक्षा रक्षकांची नेमणुणक करण्यात आली होती.  यामध्ये शाळेचा मुख्य गेट 1 यामधून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून वापरला जात आहे. याचयह केबिनमध्ये शाळेच्या आवारात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेराचे संगणक व स्क्रीन बसविण्यात आलेले होते. मात्र याच केबिनममध्ये अज्ञात चोरट्याने केबिनच्या खिडकीचे स्लायडिंग तोडून, व खिडकीमधून आतमध्ये प्रवेश करून संगणकाची स्क्रीन चोरी केल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत शाळा व्यवस्थापकाने खारघर पोलीस ठाणे गाठत चोरीची तक्रार दाखल केली आहे. याबाबत अधिक तपास खारघर पोलीस करीत आहेत.
Comments