वायएमटी इन्स्टिटयूट पनवेल संस्थेला “आयसीएसआय मुंबई स्टडी सेंटर” म्हणून मान्यता..
 “आयसीएसआय मुंबई स्टडी सेंटर” म्हणून मान्यता 

पनवेल / वार्ताहर : - इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ही भारतातील कंपनी सचिवांच्या व्यवसायाचा विकास आणि नियमन करणारी एकमेव मान्यताप्राप्त व्यावसायिक संस्था आहे. सदर संस्थेने, यशवंत मेमोरियल ट्रस्टचे, वायएमटी इन्स्टिटयूट पनवेल या संस्थेला “आयसीएसआय मुंबई स्टडी सेंटर” म्हणून मान्यता दिली आहे. 

वायएमटी इन्स्टिटयूट पनवेल येथे झालेल्या सामंजस्य करार प्रसंगी आयसीएसआयच्या वतीने  वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिलचे चेअरमन, कंपनी सेक्रेटरी राजेश तारपरा व एक्झिक्युटिव्ह असिस्टंट श्रीमती. विमला जोगडिया उपस्थित होते. कंपनी सेक्रेटरी कोर्स बद्दल ची सविस्तर माहिती - करिअर कौन्सेलिंग, सीएस एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट, सीएस एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅम, सीएस प्रोफेशनल प्रोग्रॅम यांची प्रवेश प्रक्रिया, क्लासरूम टिचिंग इत्यादी वायएमटी इन्स्टिटयूट पनवेल येथे उपलब्ध असेल, अशी माहिती प्राध्यापक व संस्थेचे सेक्रेटरी मनोज मुळे यांनी दिली असून, कॉर्पोरेट क्षेत्रात कंपनी सेक्रेटरीला असणारे स्थान आणि कायम मागणी यांचा विचार करून कंपनी सेक्रेटरी कोर्स बद्दल जाणून घेण्यासाठी विद्यार्थी व पालक वर्गांनी पुढील पत्त्यावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
यशवंत मेमोरियल ट्रस्टचे वायएमटी इन्स्टिटयूट, अशोका गार्डन्स, जुन्या पोस्टाजवळ, पनवेल  9819248771 / 9819540448.
Comments