जागतिक महिला दिनानिमित्त केदार भगत मित्र परिवारातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन..
महिलांचा सत्कार समारंभ,हळदीकुंकू,जिंकूया पैठणीचा खेळ अश्या विविध कार्यक्रमांचे आयोजन..
पनवेल, दि.3 (संजय कदम) ः सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे केदार भगत मित्र मंडळातर्फे यंदाच्या रविवारी 6 मार्च 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता व्हि.के.हायस्कूल मागील मैदानात प्रिन्स पॅराडाईज बिल्डींग जवळ वडाळे तलावासमोर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील 21 महिलांचा सत्कार समारंभ व हळदीकुंकू तसेच चला जिंकूया पैठणी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती लोकनेते रामशेठ ठाकूर, सौ.शकुंतला रामशेठ ठाकूर यांची आहे.तर उद्घाटक आ.प्रशांत ठाकूर हे असणार आहे. यानिमित्ताने लकी ड्रॉ 3 पैठणी साड्या व 21 आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या कार्यक्रमास सभागृह नेते परेश ठाकूर, महाराष्ट्र भाजपा सदस्य श्रीनंद पटवर्धन, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय.टी.देशमुख, उपमहापौर सिताताई पाटील, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष रत्नताई घरत, शहराध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अनिल भगत, अजय बहिरा, राजू सोनी, युवा मोर्चा रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, उद्योजक धिरज चावला, सौ.वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, महिला मोर्चा शहराध्यक्षा वर्षा नाईक, नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, मा.नगरसेविका निता माळी, माधुरी सुरेश सावंत, गीता नितीन पाटील, पुनम भुषण ठाकूर, रेश्मा अतुल भोईर, सुहासिनी केकाणे, सपना वासुदेव पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. यावेळी महापौर कविता किशोर चौतमोल, कल्पना विलास कोठारी, कल्पना विजय लोखंडे, सुधा विजय भगत, दिव्या दत्तकुमार सावंत, मानसी हेमंतकुमार भगत, मनिषा प्रकाश म्हात्रे, रचना सनी टाकळे, संगीता नितीन जोशी, निलीमा शैलेंद्रनाथ देवळे, फाल्गुनी अभिजीत दुर्गे, साधना मोहन पवार, कविता नरेंद्र मोकल, पुष्पा काळुराम मढवी, बेबी चंद्रकांत लोखंडे, श्रीमती.अलका कमळाकर साखरे, श्रीमती.सुमन काझी, शैला प्रभाकर मोरे, पुष्पा अशोक जाधव, भारती घरत व अबोली रिक्षा संस्था यांना सन्मान स्त्री शक्तीचा अभिमान पनवेलकरांचा हा सन्मान देवून गौरविण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त माता-भगिनींनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक केदार भगत यांनी केले आहे.
Comments