पैशांसह सापडलेले पाकीट सुभाष रोडपालकर व मयूर तांबडे यांनी केले परत..
पैशांसह सापडलेले पाकीट सुभाष रोडपालकर व  मयूर तांबडे यांनी केले परत..
पनवेल दि,२२(वार्ताहर): पैशांसह सापडलेले पाकीट शैलेंद्र सिंग यांना परत करण्यात आले आहे. त्यामुळे सिंग यांनी सुभाष रोडपालकर आणि मयुर तांबडे यांचे आभार मानले आहेत. विजय सेल्स, पनवेल जवळ नेरेपाडा येथील रिक्षा चालक सुभाष रोडपालकर यांना पाकीट सापडले. यामध्ये सात ते आठ एटीएम कार्ड, शैलेंद्र सिंग यांचे जॉब कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स व इतर महत्त्वाचे कागदपत्र होती. यात पैसे देखील होते. याची माहिती त्यांनी मयूर तांबडे यांना दिली व ते पॉकेट मयूर तांबडे यांच्याकडे दिले. मयूर यांनी पॉकेट मधील कागदपत्र तपासली व त्या क्रमांकावर फोन करण्यास सुरुवात केली. मात्र समोरील व्यक्तीने शैलेंद्र सिंग यांना ओळखत नसल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मयूर तांबडे यांनी एटीएम द्वारे बँकेत जाऊन यांची माहिती घेण्याचे ठरवले. त्यानुसार नवीन पनवेल येथील ॲक्सिस बँकेत ते गेले. त्या ठिकाणी चौकशी केल्यानंतर शैलेंद्र सिंग यांचा मोबाईल क्रमांक मिळाला. बँकेतील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून मयूर तांबडे यांचा नंबर त्यांना दिला.         बँकेतून मिळालेल्या मोबाईल क्रमांकद्वारे शैलेंद्र सिंग व मयूर तांबडे यांच्याशी बोलणे झाले. व शैलेंद्र सिंग हे मयूर तांबडे यांना खांदेश्वर पोलीस स्टेशन जवळ भेटायला आले. त्यानंतर त्यांना पैशांसह ते पॉकेट परत देण्यात आले. यावेळी त्यांनी सुभाष रोडपालकर आणि मयूर तांबडे याना धन्यवाद दिले.

फोटो: पैशांसह सापडलेले पाकीट परत करताना
Comments