डोक्यात वीट घालून पत्नीची हत्या करून पसार झालेल्या आरोपी पनवेल तालुका पोलिसांच्या ताब्यात ..
डोक्यात वीट घालून पत्नीची हत्या करून पसार झालेल्या आरोपी पनवेल तालुका पोलिसांच्या ताब्यात 

पनवेल दि,१९(संजय कदम): अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीला ठार मारून जंगलात पसार झालेल्या आरोपीला पनवेल तालुका पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पनवेल तालुक्यातील दशरथ राघो भगत यांची वीटभट्टी चिंचवली, चिंध्रण येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीला ठार मारले होते. त्यांनतर आरोपी पती दीपक उर्फ पिंटू विठ्ठल दिवा (वय 40) हा जवळील जंगलात पसार झाला होता. त्याच्या  विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल होताच वपोनि रवींद्र दौडकर यांच्या मार्गदर्शखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर, पोलीस उपनिरीक्षक भरत पाटील पोलीस उपनिरीक्षक गळवे व त्यांच्या पथकाने सदर आरोपीला परिसरातील जंगलातून ताब्यात घेतले आहे. 

Comments