सराईत मोबाईल चोरट्यास पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड..
सराईत मोबाईल चोरट्यास पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड


पनवेल, दि.21 (संजय कदम) ः पनवेल शहर परिसरात मोबाईल चोरी करणार्‍या एका सराईत गुन्हेगारा पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेवून त्याच्याकडून मोबाईल चोरीचे 4 गुन्हे उघडकीस आणले आहेत.
गेल्या काही दिवसापासून पनवेल बस स्थानक परिसरात प्रवाशांचे मोबाईल चोरीस जाण्याचे प्रमाण वाढले होते. त्यासंदर्भात वपोनि नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रविण फडतरे, पोहवा संदेश म्हात्रे, तुषार बोरसे, अमोल पाटील, मिथुन भोसले, विशाल दुधे, सचिन कोर, किरण कराड आदींच्या पथकाने गुप्तबातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी कलीम रशीद शेख, (31 रा.कोपरखैरणे) या सराईत मोबाईल चोरट्यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडून या परिसरात त्याने चोरलेले 4 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. त्याच्या अटकेमुळे अजूनही मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.



फोटो ः मोबाईल चोरट्यासह पोलिसांचे पथक
Comments
Popular posts
महिला दिनानिमित्त न्यूईरा हॉस्पिटलमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजाविणाऱ्या महिलांचा सन्मान...
Image
'शिवशक्ती मित्र मंडळ' म्हणजे आपली संस्कृती जपणारे मंडळ आणि लाईन आळी हे तर पनवेलचे 'लालबाग-परळ' - महापौर नितीन पाटील...
Image
रायगड जिल्हापरिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट...
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाचे उपजिल्हाप्रमुख भरत पाटील यांची रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ राॅकेल विक्रेते वेलफेअर असोसिएशन पनवेलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Image
गॅस दरवाढी विरोधात प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा ; केंद्र व राज्यशासनाचा काँग्रेसकडून निषेध मोर्चा...
Image