रस्त्यावर ऑईल सांडल्याने वाहनांचा अपघात; मोठी दुर्घटना टळली..
रस्त्यावर ऑईल सांडल्याने वाहनांचा अपघात; मोठी दुर्घटना टळली
पनवेल दि. वार्ताहर (संजय कदम) : पनवेल उरण नाका रोडवर गाढ़ी नदीवर शनिवारी दिनांक ५ रोजी दुपारच्या वेळेस अचानकपणे एका वाहनातून ऑईल सांडल्याने रस्ता निसरडा होऊन दहा ते बारा दुचाकी वाहने पसरल्याची घटना घडली. काही वाहन चालकांना किरकोळ दुखापत झाली. वाहने घसरू लागल्याने ज्या ठिकाणी ऑईल सांडलेले होते. त्या रस्त्यावर पनवेल कोळीवाड्यातील तरुणांनी धाव घेतली व वाहनांना मार्ग दाखवीत तात्काळ पनवेल शहर पोलिसाना व अग्निशमन दलाला पाचारण केले व रस्त्यावर पनवेल महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी पाणी मारले. यावेळी काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. पनवेल कोळीवाड्यातील तरुणामुळे अनेक वाहनचालकांचा जीव वाचला त्यामुळे त्या तरुणाचे वाहन चालकांनी आभार मानले.
Comments