नवप्रवाह फाउंडेशनच्या माध्यमातून जागतिक महिला दिन संपन्न ..
नवप्रवाह फाउंडेशनच्या माध्यमातून जागतिक महिला दिन संपन्न 
पनवेल / प्रतिनिधी : -  दिनांक ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नवप्रवाह फाउंडेशनच्या वतीने कळंबोली पनवेल येथे महिला दिन साजरा करण्यात आला.  नवप्रवाह फाउंडेशन च्या अध्यक्षा अरुणा सावंत यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर आशा पवार    ज्ञानज्योत शाळेच्या शिक्षिका यांची ओळख करून त्यांना सन्मानीत करण्यात आले.
 महिला दिनी प्रथम ,आई जिजाऊ ,राणी लक्ष्मीबाई , क्रांतीज्योती सावित्रीबाई, माता रमाई यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षा अरुणा सावंत यांनी महिलांना ८ मार्च जागतिक महिला दिन  का साजरा केला जातो त्यामागील कारण केव्हा पासून सुरू झाला त्याची पार्श्वभूमी महिलांना सांगण्यात आली. 
प्रमुख पाहुणे आशा मॅडम यांनी महिलांना शिक्षणाचे महत्त्व सांगून मोलाचे मार्गदर्शन केले. 
आजच्या युगात स्त्री ही सर्वच शेत्रात आघाडीवर आहे .तिचे कर्तुत्व यावर महिलांना प्रोत्साहित करण्यात आले. 
महिलांसाठी काही मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मान्यवरांच्या हस्ते महिलांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. वस्तीतील सर्व महिलांनी या कार्यक्रमाला चांगला सहभाग दर्शविला. कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव संदेश महाडिक आणि सभासद सुवर्णा चव्हाण, सुरेखा मोटे यांचे विशेष सहकार्य लाभले.
Comments