वयाच्या ८३ वर्षात हरिभाऊ शिंदेंना एमएची पदवी ..
वयाच्या ८३ वर्षात हरिभाऊ शिंदेंना एमएची पदवी 
पनवेल-  पनवेल शहरातील निवृत्त पोलिस अधिकारी हरिभाऊ शिंदे यांनी वयाच्या ८३ व्या वर्षात एमएची पदवी घेतली आहे.
        शिक्षणासाठी वयाची गरज नसते. प्रबळ इच्छाशक्ती असली की कोणतेही शिक्षण मनापासून घेता येते. नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात एमए पदवीचे हरिभाऊ शिंदे यांनी शिक्षण घेऊन ते बी ग्रेडमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.
       माणूस हा मरेपर्यंत विद्यार्थी असतो. शिक्षणाची कधी चोरी होत नाही. शिक्षणामुळे माणूस मोठा होतो असे विचार हरिभाऊ शिंदे यांचे असून त्यांना आतापर्यंत महाराष्ट्र शासनाचा अण्णाभाऊ साठे पुरस्कार, रायगड जिल्हा परिषदेचा रायगड भूषण तसेच पनवेल भूषण आणि जवळजवळ १९२ पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. यापुढे मी कोणतीही परीक्षा देण्यास तयार असून मला पीएचडी करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
Comments