पनवेल येथे मिशन वात्सल्य शिबिर संपन्न
पनवेल (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांचे मार्गदर्शनाखाली मिशन वात्सल्य योजने अंतर्गत कोवीड आपत्तीमुळे विधवा झालेल्या भगिनींसाठी पनवेल पंचायत समिती येथे तहसीलदार विजय तळेकर यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मिशन वात्सल्य योजना ही सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेचे खास वैशिष्ट्य म्हणजे ह्या मिशन वात्सल्य योजने अंतर्गत कोरोनामुळे दोन्ही पालकांचे निधन होऊन अनाथ झालेल्या बालकांना तसेच एकाध्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाचे जर निधन झाले असेल तर अशा विधवा झालेल्या महिलांना आपल्या महाराष्ट्र शासनाच्या मार्फत एक आधार म्हणून त्यांच्या घरी जाऊन सरकारी कर्मचारी तसेच अधिकारी हे विविध शासकीय योजनांचे अर्ज हे भरून घेणार आहे. तसेच या महिलांना तसेच पालक गमावलेल्या बालकांना विविध शासकीय योजनांचा लाभ हा घरबसल्या मिळवून देण्यात येणार आहे. एकंदरीतच 'शासन आपल्या दारी' ही संकल्पना राबवून या संकल्पनेवर आधारित 'मिशन वात्सल्य' ही योजना आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात चालविण्यात येणार आहे. या योजनेची पद्धतशीरपणे अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये समन्वय समित्या ह्या स्थापन केलेल्या आहेत. या योजने अंतर्गत कायदेशीर मालमत्तांमधील हक्क हा मिळवून देण्यात येणार आहे. म्हणजेच या मिशन वात्सल्य योजना च्या माध्यमातून लाभार्थ्यांना शासनाच्या विविध सध्या सुरू असलेल्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व तहसीलदार कार्यालय पनवेल यांचे विद्यमाने पनवेल येथील पंचायत समिती सभागृहात कोविड आपत्तीमुळे विधवा झालेल्या महिला भगिनींचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते.यामध्ये युवा प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी विनामूल्य कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे .प्रामुख्याने नर्सिंग, कॉम्पुटर, मोबाईल दुरुस्ती, वाहन चालक, डिलिव्हरी गर्ल ,टेलरिंग इत्यादी कोर्सेस साठी ५० महिलांनी सहभाग नोंदवला