एक लाख 39 हजार रुपये किमतीचे घड्याळ व ब्ल्यूटूथ स्पीकरची चोरी

एक लाख 39 हजार रुपये किमतीचे घड्याळ व ब्ल्यूटूथ स्पीकरची चोरी

पनवेल दि,१९(वार्ताहर): कंपनीच्या वेअर हाऊसमध्ये असणाऱ्या बोट कंपनीच्या डिजिटल स्मार्ट वॉच व ब्लूटूथ स्पीकरचे कार्टून काढून त्यातून एक लाख 39 हजार रुपये किमतीचे वॉच, ब्लूटूथ स्पीकरची चोरी केल्याप्रकरणी तिघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.          
पाडेघर जेडब्ल्यू आर कंपनी येथे मालाच्या गोडाऊनवर लक्ष ठेवण्याकरता 114 सिक्युरिटी गार्डची नेमणूक करण्यात आली आहे. चायना देशातून बोट कंपनीचे ब्लूटूथ स्पीकर आणि वॉच आयात करण्यात आले होते. हे सील तोडून वेअर हाऊसची पाहणी केली असता वेअर हाऊसमधील कार्टून फाटलेले दिसून आले. त्यावेळी वेअरहाऊसमध्ये चोरी झाली असल्याचे प्रवीण वर्तक यांच्या लक्षात आले. संकेत रामटेके (उरण), मिथुन म्हात्रे (उरण) आणि अनिकेत पारधी (वज्रेश्वरी) यांच्याविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Comments